हेल्मेट न वापरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

Foto
एकाच दिवसात ११ लाखांहून अधिक दंड वसूल
मोहीम तीव्र करणार
हेल्मेट दंडापासून वाचण्यासाठी नसून तर स्वतः चा जीव वाचवण्यासाठी आहे. शहरात आगामी काळात ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल; त्यामुळे नागरिकांनी दुचाकी चालवताना आवर्जून
हेल्मेटचा वापर करावा. सुभाष भुजंग, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक)
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) :
शहरातील वाढते अपघात रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने गुरुवारी (दि. २७) विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाईची विशेष मोहीम राबवली. सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत शहराच्या विविध भागांत राबवलेल्या या मोहिमेत १ हजार १३० निष्काळजी दुचाकीस्वारांना दणका देत तब्बल ११ लाख ३० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
रस्ते अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने चालकांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढल्याने पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी हेल्मेट सक्तीने वापरण्याचे आवाहन केले होते. मात्र, अनेक वाहनचालक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आल्यानंतर वाहतूक विभागाने ही मोहीम हाती घेतली. ही कारवाई पोलिस निरीक्षक रेखा लोंढे, मंगेश जगताप, पवन चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक रविकांत गच्चे, सचिन मिरघे आणि त्यांच्या पथकाने केली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions